तिरोडा – तिरोडा रेल्वे स्टेशन वर डाऊन प्लॅटफॉर्मवर वर तिकीट खिडकीची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे डाउन प्लॅटफॉर्मवरून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. अपलाइनवर दोन तिकीट खिडक्या दिल्या आहेत. परंतु डाउन लाइनवर एकही तिकीट खिडकी उपलब्ध नाही. अपलाइन प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यासाठी प्रवाशाला डाउन लाइनवरून पुलावरून चढावे लागते. चढताना अनेक वेळा ट्रेन चुकते. ज्येष्ठ नागरिकांना चढताना खूप त्रास सहन करावा लागतो.
कवलेवाडा परिसरातील 10 ते पंधरा गावातील प्रवासी डाउन प्लॅटफॉर्मवरून दररोज ये – जा करतात त्यांना तिकीट काढण्यासाठी पुलिया ओलांडून तिकीट काढायला जावे लागते त्यामुळे प्रवाशांनी आपल्या समस्या किरणभाऊ पारधी यांच्यासमोर उपस्थित केला. तरी पण आपण डाउन प्लॅटफॉर्मवर वर तिकीट खिडकीची व्यवस्था करावी. असा निवेदन तिरोडा रेल्वे स्टेशन प्रबंधक यांच्या द्वारे विभागीय रेल प्रबंधक विभागीय रेल कार्यालय नागपूर विभाग यांना पाठविण्यात आला.
यावेळी पिंटू चौधरी, तुरेंद्र नागपुरे सरपंच मांडवी, भोजलालजी नागपुरे, मोरेश्वरजी नागपुरे, महेश लिल्हारे सरपंच भंभोडी,योगेश टेभरे, रवी बोळणे उपस्थित होते.








