Home » शिक्षात्मक » शिक्षण » आय.जी.एम.कंप्युटर चे संचालक सारंग मानकर यांचा सत्कार

आय.जी.एम.कंप्युटर चे संचालक सारंग मानकर यांचा सत्कार

Share:

 

तिरोडा – महाराष्‍ट्र ज्ञान महामंडळाचे मा.व्‍यवस्‍थापकिय संचालक
श्री.विवेक सावंत सर यांचे हस्‍ते आय.जी.एम.कॉम्प्युटर ला 23 वर्षे पुर्ण झाल्‍याबद्‍दल तसेच शिक्षण व सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य केल्‍याबद्‍दल तिरोडा येथील आय.जी.एम. कम्‍प्‍युटरचे संचालक श्री.सारंग मानकर सर यांचा सत्‍कार पुणे येथील बॅकेट हॉल मध्ये करण्यात आला.महाराष्‍ट्र ज्ञान महामंडळ पुणे MKCLचे 25 वा स्‍थापना दिवस समारंभ दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोज बुधवारला बँकेट हॉल पुणे येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला महाराष्‍ट्र राज्‍याचे मुख्‍यमंत्री श्री देवेंद्रजी फडणविस महाराष्‍ट्र राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री श्री. अजितदादा पवार व महाराष्‍ट्र राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे उपस्‍थितीत होते तिरोडा तालुक्‍यात सतत 23 वर्षोपासुन आय जी एम. कॅम्पुटर शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांना कॅम्पुटर चे प्रशिक्षण देत आहेत म्‍हणुन आय जी एम संगणक शिक्षण संस्था तिरोडा चे संचालक श्री सारंग मानकर सर यांचा पुणे येथील कार्यक्रमात सत्‍कार करण्यात आला. सदर श्रेयाकरीता मा.श्री शशिकांत देशपांडे सर नागपूर विभागीय प्रमुख, मा.श्री उमेश वैद्य सर गोंदिया जिल्‍हा प्रमुख , व मा. श्री विजयजी रहांगडाले आमदार तिरोडा विधानसभा क्षेत्र, सौ.श्वेता सारंग मानकर तसेच सर्व विद्यार्थी, पालक व कर्मचारी वृंद यांचे मार्गदर्शन लाभले याकरीता सारंग मानकर यांनी सर्वांचे मन:पुर्वक आभार
मानले.

Leave a Comment