Home » शिक्षात्मक » शिक्षण » माझी कन्या भाग्यश्री एफडी चे वितरणत

माझी कन्या भाग्यश्री एफडी चे वितरणत

Share:

 तिरोडा – ग्राम वडेगाव येथे दिनांक 11 डिसेंबर 2025 ला सकाळी 11 वाजता गुरुवारला महिला व बाल विकास प्रकल्प तिरोडा अंतर्गत वडेगाव येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस तर्फे माझी कन्या भाग्यश्री एफ डी प्रमाणपत्राचे वाटप मा.सभापती तेजरामजी चव्हाण, जी. प. सदस्य तुमेश्वरीताई बघेले , दिपालीताई टेंभेकर पंचायत समिती सदस्य तिरोडा, मा. शामरावजी बिसेन सरपंच ग्रामपंचायत वडेगाव, उपसरपंच डीलेश्वरी ताई गौतम, पोलीस पाटील मुन्ना भाऊ सोने वाने , बाल विकास प्रकल्प अधिकारी माननीय विनोद भाऊ चौधरी, दिपाली ताई नवथळे पर्यवेक्षिका बीट वडेगाव यांच्या हस्ते 34 लाभार्थ्यांना एफडी वितरित करण्यात आले. कार्यक्रमात प्रामुख्याने माननीय ग्रामविकास अधिकारी प्रकाश चामट,बाळकृष्णजी सोनेवाने माजी उपसरपंच, महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष माननीय विनायक भाऊ बडगे, रंजूताई अंबुले, सिंधूताई बावनकर, राणीताई राठोड, बिंझाडे जी, रजनीताई, राजकुमार पटले, ग्राम पंचायत सदस्य वडेगाव, नंदाताई कावळे, ममता ताई बोदे ले ,हेमलता ताई साखरे, नम्रता ताई राऊत, श्याम कला ताई बिसेन, वैशाली कावळे, मदतनीस शिल्पा वालदे,, वर्षा वालदे अश्विनी कावळे, रक्षा बोदे ले, प्रज्ञा रामटेके, रोशनी साठवणे, रसिका राऊत अंगणवाडी सेविका कोडे लोहारा, बीट्टी इंगळे चीच टोली , माननीय बिहारीलाल राहं गडाले रियल पावर पावर मॅन उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत चे कर्मचारी, एफडी चे संपूर्ण लाभार्थी चिमुकले बालक यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय प्रकल्प अधिकारी विनोदजी चौधरी सर यांनी केले तर संचालन नंदा कावळे अंगणवाडी सेविका यांनी केले असून पाहुण्यांचे आभार मानण्याचे कार्य ममता बोदेले अंगणवाडी सेविका वडेगाव यांनी केले. प्रस्तुत कार्यक्रमात तुमे श्वरी ताई बघेले यांनी स्त्रियांना मोलाचे मार्ग मार्गदर्शन केले. बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत ही मोहीम असून त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा, असे निक्षून सांगितले. माननीय तेजरामजी चव्हाण पंचायत समिती तिरोडा मुला मुलीत भेद न करता मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणावे असे सांगितले. सरपंच शामरावजी बि सेन यांनी शासनाच्या योग्य योजनांचा लाभ घ्यावा, विकास साधावा, सहकार्य करावे,येणाऱ्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मुलींना• शिकविले च पाहिजे शिक्षणाशिवाय त्यांचा तर उद्धार नाही, असे प्रतिपादन दिपाली ताई टेंभेकर पंचायत समिती तिरोडा यांनी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदाताई कावळे, ममताताई बोदे ले,सर्व अंगणवाडी सेविका बीट वडे गाव यांनी सहकार्य केले.

Leave a Comment