Home » शिक्षात्मक » शिक्षण » ट्रॅक्टरच्या धाडकेत 2 युवकांचा मृत्यू

ट्रॅक्टरच्या धाडकेत 2 युवकांचा मृत्यू

Share:

तिरोडा :-  दि.26 डिसेंबर ला सकाळी 9.30 ते 10 वा. दरम्यान तिरोडा ते बिर्सी मोठा नाला ठिकाणी मृतक यश राजुके वय 18 वर्ष हा मो.सा. क्र. एम. एच.36ए. पी. 6454 नी त्याचा मित्र भारत बनकर वय 18 वर्ष रा. देव्हाडी ता. तुमसर जी. भंडारा येथील राहिवासी असून दोन्ही दवनीवाडा येथे डब्बल सिट जात असताना समोरुन तिरोडाकडुन बिर्सीकडे येणारा सोनालीका कंपनीचा निळ्या रंगाचा टॅक्टर ज्याचा क्र.एम.एच.35टी.सी. 94 व निळ्या रंगाची ट्रॉली क्र. एम. एच. 35 एफ.5167 चा चालकाने आपले ताब्यातील टॅक्टर व ट्रॉली भरधाव वेगाने निष्काळजीपणे व हयीगयीने चालवुन मो.सा. चालक यश राजुके याचे मो.सा. ला समोरासमोर धडक देवुन मो.सा. चालक यश राजुके व मागे बसलेला भारत बनकर यांना गंभीर जख्मी करुन दोघांचे मरणास कारणीभुत झाल्याने आकाश मेश्राम यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन व मा. ठाणेदार सा. यांचे आदेशान्वये सदरचा गुन्हा दाखल करुन तपासात घेतला.

पुढील तपास पो.उपनी नस्टे पोलीस ठाणे तिरोडा करीत आहेत.

Leave a Comment