Home » शिक्षात्मक » शिक्षण » जागृती संस्थेचा अजब लीला गजब कारभाराला कंटाळून जागृती सभासदांचा जागृती विरुध्द प्रजास्ताक दिनी आत्मदहनाचा इशारा.

जागृती संस्थेचा अजब लीला गजब कारभाराला कंटाळून जागृती सभासदांचा जागृती विरुध्द प्रजास्ताक दिनी आत्मदहनाचा इशारा.

Share:

तिरोडा :-देशाच्या ७६ व्या प्रजासताक दिनाचे औचित्य साधून जागृती सहकारी संस्था मर्यादा मुंडिकोटा तालुका तिरोडा जिल्हा विरुध्द जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे आत्मदहन करण्याचा इशारा जागृती सहकारी संस्थांचे सभासद यांनी दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा उपनिबंधक गोंदिया यांना निवेदनामार्फत कळविले आहे.

सविस्तर वृत्त असे की, जागृती सहकारी संस्था मुंडीकोटा चे माजी संचालक मंडळ आणि व्यवस्थापक असे २३ लोकांवर संस्थेचे गैरकारभार व नियमबाह्य संस्थेत कार्य केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल आहे.
यामुळे ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या. येथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली होती. पण अल्पवधी कालावधीत प्रशासक बरखास्त करून आनन फानन करून संगनमताने संचालक मंडळ नेमण्यात आले.
सदरचे संचालक मंडळ हेच माजी संचालक मंडळाचे बाहुले असल्याने मोठ्या प्रमाणात आरोपींना लाभ मिळविण्याचे हेतूने कार्य सुरू आहे. यासाठी कर्जदारांना शक्तीची कर्ज वसुली केली जाते. शिवाय कर्जदारांना कायद्याचा धाक, दरारा, भीती निर्माण करून नियम बाह्यपने व्याजाची आकारणी करून कर्जदारांकडून मुद्दलाचे ३ ते ५ पट इतके वसुली सुरू आहे. मात्र ठेवीदारांना ठेव परत करतांना त्यांना त्यांचे ठेवीचे ३० ते ५० % टक्के रक्कम देवून मोठ्या प्रमाणात ठेवीदारांचे शोषण करून कर्जदारांची पिळवणूक करून आरोपितांना लाभ पोहचेल असे कृत्य सुरू आहे.

           कर्जदारांकडून वारेमाप व्याजाची आकारणी तर दुसरीकडे ठेवीदारांना त्याचे ठेवीचे ३० ते ५० टक्के रकमा देवून पूर्ण ठेवीवर सही घेण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात केले जात आहे. यासाठी उपलेखा परिक्षकांची मुक संमती असल्याचा आरोप सभासदांकडून केला जात आहे. इतकेच नव्हे तर लेखा परीक्षण न करताच आमसभाचे केले जात आहे. यावर पायबंद बसणे अनिवार्य आहे.

संचालकांचे या नियमबाह्य व बेजबाबदार कारभाराला कंटाळून दिनांक ३०/०९/२०२५ च्या आमसभेत ठेवीदारांनी ३० ते ५०% टक्के मिळणाऱ्या ठेव रकमेचा विरोध करून ठेवीदारांनी ठेवीवरील व्याज मिळाले नाही तरी चालेल पण आमच्या हक्काच्या, निरपल्या घामाच्या आणि पै पै जोडून ठेवलेल्या पूर्ण ठेवींची/मुद्दल रकमेची मागणी लावून धरली. यामुळे कर्जदारांनी सुध्दा ३ ते ५ पट व्याजाचा परतावा सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कमल ४४ अ चे विरुध्द असल्याचे सांगून मुद्दल कर्जाचे अर्धे व्याज घेण्याचा प्रस्ताव मांडला. असे करणे शक्य नसल्याने यातून शासनाची ओटिएस योजना लागू करण्याचा प्रस्ताव आला. आमसभेत गदारोळ निर्माण होत असल्याने पाच कर्जदार आणि पाच ठेवीदार यांची आमसभेत निवड करून ओटीएस ठरावाची इथंभुत व सर्व साधक बाधक चर्चा करून सर्व संमतीने, एकमताने ओटीएस लागू करण्याचा ठराव पारित करण्यात आला. यानुसार सामोपचार ओटीएस योजनेनुसार प्रपत्र क अर्ज कर्जदारांनी संस्थेला दिले. कर्जदार ओटीएस योजना प्रमाणे कर्ज भरून पावण्यास तयार असतांना उपलेखा परीक्षकाचे हवाला देत संचालक मंडळाने ओटीएस योजना लागू करता येत नसल्याचे कळविले असल्याने कर्जदारांना मुद्दलाचे ३ ते ५ पट व्याज देणे गैरसोयीचे होणार असून ठेवीदारांना त्याचे ठेवीची ३० ते ५० टक्के रक्कम देवून आरोपींना लाभ पोहचविण्याचे मनसुबा हाणून पाडण्यासाठी अखेर जागृती सभासदांनी २६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी यांचे कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा ईशारा निवेदनाच्या माध्यमातून शासन व प्रशासनाला दिला आहे.
आरोपींना पूर्णपणे वाचवण्यासाठी संचालक मंडळ कायद्याला बगल देवून नियमबाह्यपने कर्जदारांकडून ३ ते ५ पट कर्ज नियमबाह्यपने वसुली करीत आहे.
शासनाची ओटीएस योजना लागू झाल्यास कर्जदारांचे रकमा संस्थेत जमा होतील ज्यामुळे ठेवीदारांना त्यांचे पूर्ण आणि व्याजासह रकमा देणे लागतील. असे घडल्यास आरोपींकडून अधिका अधिक वसुली घडेल. केवळ आरोपींचा बचाव करण्यासाठी संचालक मंडळ कार्य करीत आहे.
प्रतिक्रिया:
आत्मदहन करता राजू चामट यांनी रात्री प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर दुपारी एक वाजेच्या दरम्यान डी डी आर कार्यालयातून संबंधित कर्मचाऱ्यांनी कॉल करून डी डी आर मॅडमनी तुम्हाला चर्चेसाठी बोलवले आहे असा कॉल आला आम्ही चर्चेसाठी तीन वाजता पर्यंत पोहोचतो असे त्यांना उत्तर दिले आणि त्यानंतर घरून निघत असताना आम्ही येतो म्हणून कॉल केला तेव्हा मॅडमने आम्हाला प्रत्युत्तरात आता तुम्ही येऊ नका मला नागपूरला निघणे आहे त्यामुळे पुढील चर्चा पुढच्या आठवड्यात होईल असे सांगितले त्यामुळे आम्ही प्रतीक तर देत असताना आठवड्याच पूर्वी 26 तारीख येत आहे त्यामुळे आमच्या आत्मदहन हे निश्चित आहे तुम्ही चर्चेला न बोलवता पुढील आठवड्याची तारीख दिल्यामुळे आमचे आत्मदहन करणे निश्चित आहे आणि याचे सर्वस्वी जबाबदार संबंधित विभाग आणि जागृती फिगर शेतकरी पतसंस्था असेल असे आम्ही उत्तर दिले त्यामुळे त्यांनी फोन काटला आणि बंद केला मागील वर्षभरापासून आम्ही अनेक पत्रव्यवहार करून आम्हाला न्याय मिळत नसणार नसल्याने आम्ही हा आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे तरीही फोन करून आम्हाला बोलावलं आणि त्यानंतर तुम्ही येऊ नका असे सांगितले असा डी डी आर मॅडमचा हेकखोरपणा आमच्या लक्षात आला आणि आम्हाला मरणाच्या दारात नेऊन ठेवले आहे निश्चितच अशा अन्याय प्रशासनाविरुद्ध आम्ही आत्मदनात मेलो तर यांना सर्वस्वी जबाबदार धरण्यात यावा हीच विनंती.

Leave a Comment