* *तिरोडा*बकऱ्या चारावयास गेलेल्या महिलेच्या अंगावर वीज पडली. यात तिचा मृत्यू झाला. शासनातर्फे या महिलेच्या कुटुंबास चार लाख रुपयांचा धनादेश आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते देण्यात आला. 27 एप्रिल रोजी तिरोडा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. बिरसी येथील रहिवासी मंगला जितेंद्र बोरकर वय 50 वर्षे हिच्या अंगावर वीज पडून तिचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे शासनातर्फे देण्यात येत असलेल्या मदतीनुसार 2 जून रोजी तिरोडा तहसील कार्यालयात मृत महिलेचे पती जितेंद्र बोरकर यांना आ. विजय रहागंडाले यांच्या हस्ते चार लक्ष रुपयांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. यावेळी तहसीलदार एन. एम. ठाकरे, नायब तहसीलदार अजय सकुंदरवार, एम. एम. हुकरे, बिरसीचे सरपंच श्यामा शरणागत, किरण वैद्य, पोलीस पाटील दर्याव रिनायत हे उपस्थित होते.








