अखेरचे अद्यतनित:
Shahrukh Khan: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानसोबत काम करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. त्याच्यासोबत काम करण्यासाठी अनेक लोक वर्षानुवर्षे वाट पाहतात.

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानसोबत काम करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. त्याच्यासोबत काम करण्यासाठी अनेक लोक वर्षानुवर्षे वाट पाहतात. प्रत्येकाचा शाहरुखसोबत काम करण्याचा अनुभव खास आणि हटके असतो. मात्र एका अभिनेत्रीने चक्क शाहरुखच्या कानशिलात लगावली होती. तिने स्वतःचा ही घटनेचा किस्सा सांगितला.
शाहरुखच्या थोबाडित मारणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून प्रिया गिल आहे. 90 च्या दशकात तिच्या निरागस चेहऱ्याने लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रिया गिल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘सिर्फ तुम’ आणि ‘जोश’ या हिट चित्रपटांमध्ये झळकलेली प्रिया काही काळासाठीच बॉलिवूडमध्ये होती, पण तिने साकारलेल्या भूमिका आजही चाहत्यांच्या आठवणीत ताज्या आहेत.
अभिनेत्रीने शाहरुखच्या थोबाडित मारली
गोव्यात ‘जोश’ चं शूटिंग सुरू होतं. एक गाण्याचं सीन होता ज्यामध्ये प्रियाला शाहरुखला कानशिलात मारायची होती. दिग्दर्शक मन्सूर खान परत परत सांगत होता “थोडं दमदार मार! असं वाटायला हवं की ही मुलगी खरंच रागावलीये.” शाहरुख सुद्धा म्हणत होता, “मार! घाबरू नकोस… मी आहे ना!” आणि मग काय… प्रिया गिलने धाडस केलं आणि एक जोरात थोबाडित मारली.
थोबाडित मारताच संपूर्ण सेट स्तब्ध झाला. प्रिया म्हणते, “मला वाटतं सगळे एवढे थक्क झाले की कुणीच काही बोललंच नाही. दिग्दर्शकही ‘कट’ म्हणायला विसरला.” कॅमेरामन के. व्ही. म्हणाले, “तू शाहरुख खानला थोबाडित मारलीस! आता मुली तुला माफ करणार नाहीत.”
प्रिया सांगते की ती खूपच लाजली होती. “तो माझ्या आयुष्यातील सर्वात लज्जास्पद क्षण होता,” शाहरुखने मात्र मोठेपणा दाखवला. तो शांत होता आणि तिला समजावत होता की सीन कसा परफॉर्म करायचा. प्रिया पुढे म्हणते, “तो खरोखर एक जेंटलमन आहे. त्याने मला एक क्षणही असं वाटू दिलं नाही की मी काही चुकीचं केलं.”
मुंबई, महाराष्ट्र
जून 02, 2025 4:45 दुपारी आहे








