अखेरचे अद्यतनित:
सहा महिन्यांपूर्वी देखील महिलेचा मुलगा, सून आणि सुनेच्या वडिलांनी ऊसाच्या शेतात मारहाण केली होती

सोलापूर : शेत जमिनीसाठी जन्मदात्या आईचा खून लेकाने बायकोच्या मदतीने केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लक्ष्मी महाडिक (32 वर्षे) असे वृद्ध आईचे नाव आहे. ही घटना 30 मे रोजी रात्री साडे नऊ वाजता माढ्यातील मुंगशी येथे घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचा मुलगा दत्तात्रय महाडिक, सून रजनी महाडिक तसेच व्याही धर्मराज बागल या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शेतीसाठी आईचा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुलाशी आणि सुनेशी वारंवार वाद
समोर आलेल्या माहितीनुसार, मृत महिला लक्ष्मी महाडिक यांची आठ एकर शेतजमीन आहे. महिलेला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दहा महिन्यापूर्वीच पतीचे निधन झाले. तर मुलगी विवाहित असून ती ऑस्ट्रेलियाला राहते. वृद्ध महिलेचे मुलगा आणि सुनेशी पटत नसल्याने ती वेगळी राहत होती. मुलगा शेजारी पक्क्या घरता राहत होता तर आई पत्र्याच्या शेडमध्ये राहत होती. शेतीसाठी महिलचे कायम मुलाशी आणि सुनेशी वारंवार वाद होत होते. सहा महिन्यांपूर्वी देखील महिलेचा मुलगा, सून आणि सुनेच्या वडिलांनी ऊसाच्या शेतात मारहाण केली होती.
महिलेच्या मुलीने केला ऑस्ट्रेलियावरून फोन
लक्ष्मी यांची मुलगी कल्पना जी ऑस्ट्रेलियात राहते तिने आतेभावाला फोन केला. माझ्या आईला शेतात मारून टाकले आहे, तू जाऊन बघ असा निरोप पाठवला. त्यानंतर आतेभाऊ मारुती रेवडे आत्याच्या घरी केला तेव्हा त्याला घराबाहेर प्रचंड गर्दी दिसली. उसाच्या शेतामध्ये जाऊन पाहिले असता उसाच्या सरीमध्ये लक्ष्मी महाडिक या रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडलेल्या होत्या. तिच्या डोक्यातून रक्त येत होते, तिचा गळा कपड्याने आवळलेला होता आणि तोंडावर, डोक्यात दगडाने मारल्याच्या खुणा होत्या, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सोलापूर, महाराष्ट्र
02 जून, 2025 4:37 दुपारी आहे
‘आईला शेतात मारून टाकलंय, तू जाऊन बघ’, लेकीचा आतेभावाला ऑस्ट्रेलियावरून फोन; माढ्यात मुलानेच घेतला जीव








