Home » शिक्षात्मक » शिक्षण » ठाकरेंचा बडा नेता फडणवीसांच्या भेटीला, गिरीश महाजन म्हणाले, पुढच्या ८ दिवसांत भूकंप होणार

ठाकरेंचा बडा नेता फडणवीसांच्या भेटीला, गिरीश महाजन म्हणाले, पुढच्या ८ दिवसांत भूकंप होणार

Share:

अखेरचे अद्यतनित:

Sudhakar Badgujar Met Cm Devendra fadanvis: महापालिका निवडणुकीला अवघे तीन महिने राहिलेले असताना मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यात ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी फडणवीस यांची भेट घेतली.

सुधाकर बडगुजर मुख्यमंत्री फडणवीस भेटसुधाकर बडगुजर मुख्यमंत्री फडणवीस भेट
सुधाकर बडगुजर मुख्यमंत्री फडणवीस भेट

नाशिक : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अवघ्या तीन-साडे तीन महिन्यांवर आलेल्या असताना राजकीय पक्षांच्या डावपेचांना सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे नाशिकचे बडे नेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

मुंबई महानगरपालिकेतील जवळपास ५० हून अधिक माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर नाशिकमध्येही दणके देण्यासाठी भाजप सज्ज असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी संकेत दिले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात कोण राहतो आणि कोण कोण पक्ष सोडतो, हे पुढच्या आठ दिवसांत समजेल, असे गिरीश महाजन म्हणाले. त्यामुळे बडगुजर यांनी फडणवीसांच्या घेतलेल्या भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली.

…म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली- सुधाकर बडगुजर

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने म्युनिसिपल सेनेच्या वतीने निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याचे बडगुजर यांनी भेटीनंतर सांगितले. क्लास वन, क्लास टू मधील रिक्त पदे भरणे गरजेचे असल्याचे भेटीत फडणवीस यांना सांगितल्याचे बडगुजर म्हणाले. शिवाय रविवारीच मी फडणवीस यांची वेळ मागितली होती, असेही बडगुजर यांनी स्पष्ट केले.

मी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार याची संजय राऊतांना माहिती होती

आमच्या कामगार सेनेच्या तीन प्रमुख मागण्या होत्या. आमच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेले आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाणार होतो, हे संजय राऊत यांच्यासह सर्वांना माहिती होते, असेही बडगुजर यांनी सांगितले.

नाशिकमध्ये पुढच्या आठ दिवसांत भूकंप

ठाकरे गट जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या पक्षात पुढच्या ८ दिवसांत भूकंप होणार आहे, असे भाकीत मंत्री गिरीश महाजन यांनी केले. तसेच उद्धव ठाकरे यांच्या पक्षात कोण राहणार आणि कोण कोण सोडून जाणार हे लवकरच तुम्हाला कळेल. ठाकरेंना संपवायला संजय राऊत एकटेच पुरेसे आहेत, असेही महाजन म्हणाले.

Source link

Leave a Comment