Home » शिक्षात्मक » शिक्षण » माल वाहणातून जनावरांची वाहतूक दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल

माल वाहणातून जनावरांची वाहतूक दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल

Share:

तिरोडा – पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी विकी धांडे हे आपले सहकारी कर्मचाऱ्यांसह ६ जून चे रात्री ११.१५ वाजता दरम्यान तिरोडा शहरात गस्तीवर असताना त्यांना भूतनाथ वार्ड तिरोडा इथून एक मिनि मालवाहक वाहन संशयास्पद रित्या जात असल्याचे दिसून आल्याने सदर वाहन थांबवून पाहणी केली असता या वाहनात दोन गाई व तीन वासरांची चारा पाण्याची कुठलीही व्यवस्था न करता दाटीवाटीने अवैधरित्या वाहतूक करीत असल्याचे दिसून आल्यावरुन सदर वाहन क्रमांक एम. एच. ४२ एक्यू ३८३६ अंदाजे किंमत ४ लक्ष रुपये व जनावरे १७ हजार रुपये असा एकूण ४ लक्ष १७हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून वाहनचानक मनीष लिल्हारे ४० वर्ष, रा. भूतनाथ वार्ड तिरोडा व मोरेश्वर काशिनाथ बिसेन रा. मलपुरी यांचे विरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम ११(१) (ड), महाराष्ट्र पशु संरक्षरण अधिनियम कलम ५, ६ ९ नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास हवालदार ब्रिजेश मडावी करीत आहेत.

Leave a Comment