Home » शिक्षात्मक » शिक्षण » तिरोडा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी 7 ट्रॅक्टर 1 जेसिपी पोलिसांच्या ताब्यात आणि 1 शिफ्ट चारचाकी गाडीचा शोध सुरु

तिरोडा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी 7 ट्रॅक्टर 1 जेसिपी पोलिसांच्या ताब्यात आणि 1 शिफ्ट चारचाकी गाडीचा शोध सुरु 

Share:

तिरोडा दि. 12 जून ला तिरोडा पोलीस रात्री गस्त वर असताना तिरोडा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अमित वानखडे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की घाटकूरोडा येथिल वैनगंगा नदीपात्रामध्ये जेसिबी च्या साहाय्याने अवैध रेती वाहतूक करीत आहेत अशी माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमित वानखडे हे आपल्या कर्मचाऱ्यासोबत सहाय्य्क पोलीस निरीक्षक संजय कवडे, चालक पोलीस शिपाई कोरे, पोलीस हवालदार संजू बांते, पोलीस शिपाई अमित गायकवाड, चालक पोलीस शिपाई टेम्भूर्णीकर, पोलीस शिपाई शैलेश दमाहे, पोलीस शिपाई अंबादे, पोलीस शिपाई पटले, चालक पोलीस शिपाई इलमे सोबत घाटकूरोडा नदी पात्रामध्ये जात असताना त्यांच्या पुढे असलेल्या पांढऱ्या रंगाची शिफ्ट गाडी क्रं. MH 35 AR 7703 गाडी चालक, मालक ने ट्रॅक्टर व जेसीबी चालकांना पळण्याचा इशारा दिला त्यामुळे ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टर मधील रेती नदी पात्रात खाली करून ट्रॅक्टर घाटकूरोडाचे दिशेने पळविले असता त्यांचा त्यांचा पोलीस स्टाफ ने त्यांचा पाठलाग करून 7 ट्रॅक्टर व 1 जेसीबी पकडले असता ट्रॅक्टर चालकांनी त्यांचे ट्रॅक्टर जागीच ठेऊन घाटकूरोडा शिवारात पळ काढला. त्यांचे ताब्यातील ट्रॅक्टर व जेसीबी पंचांसमक्ष जप्त करण्यात आले.

एकूण 6200000 लक्ष रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ट्रॅक्टर चालक, मालक तसेच पिवळ्या रंगाची जेसिबी चे चालक मालक व शिफ्ट गाडी क्रं. MH 35 AR 7703 चे चालक व मालक याने अवैधारित्या रेती वाहतूक करण्यास मदत केली असल्याने त्यांचे विरुद्ध कलम 112,305(ड ) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा नोंद होण्यासाठी शासनातर्फे लेखी फिर्याद पो. शी. अमित परसराम गायकवाड यांनी केली आहे.

Leave a Comment