तिरोडा – रस्त्याचा विकास व्हावा, नागरिकांना आवागमन करताना त्रास नको, याकरिता सरकार विविध योजनेअंतर्गत रस्ते बनवित असते. परंतु, सरकार रस्ते बनविण्याकरिता ज्या कंत्राटदारांना टेंडर देत असते ते कंत्राटदार नित्कृष्ट दर्जाचे रस्तेvबनवित असल्याचे तिरोडा येथिल उपविभागीय कार्यालयासमोरील नागरी सुविधा योजने अंतर्गत बनत असलेला सिमेंट रोड नित्कृष्ट दर्जाचा बनत आहे.
तिरोडा उपविभागीय कार्यालयासमोरील रोड हा फुटलेला होता त्यामुळे तिथे नवीन रोड बनायला सुरुवात झाली परंतु परंतु कंत्राटदाराणे त्या रोडावर मुरूम घातला हे खरे परंतु त्या नुरुमावर पाणी न मारता बेलन नी तो मुरूम न दाबता त्यांच्यावरच रोड बनविण्यास सुरुवात केली सदर माहिती कनिष्ठ अभियंता नगर परिषद तिरोडा यांना देण्यात आली परंतु त्यांनी आतापर्यंत कोणतेच कारवाई करण्यात आली
तरी पण संबंधित विभागाने रोडाचीपाहनी करून त्यांचे त्यांचे बील देयके थांबिवण्यात यावे अशी जनमाणसात चर्चा आहे.
प्रतिक्रिया
ज्या ठिकाणी रोड बनत आहे त्या ठिकाणी मी स्वतः जाऊन पाहणी करणार सदर कंत्राटदारास रोड चांगल्या दर्जाचा बनवा असे सांगणार.
अखिलेश सोनटक्के
कनिष्ठ अभियंता नगरपरिषद तिरोडा (J.E.)








