Home » शिक्षात्मक » शिक्षण » पांजरा ते खुरखुडी रस्ता नित्कृष्ट दर्जाचा

पांजरा ते खुरखुडी रस्ता नित्कृष्ट दर्जाचा

Share:

 

मुंडीकोटा – रस्त्याचा विकास व्हावा, नागरिकांना आवागमन करताना त्रास नको, याकरिता सरकार विविध योजनेअंतर्गत रस्ते बनवित असते. परंतु सरकार रस्ते बनविण्याकरिता ज्या कंत्राटदारांना टेंडर देत असते ते कंत्राटदार नित्कृष्ट दर्जाचे रस्ते बनवित असल्याचे पांजरा ते खुरखुडी रस्त्याच्या बांधकामावरून दिसून येते.

तिरोडा तालुक्यातील पांजरा ते खुरखुडी हा रस्ता फुटलेला होता. ठिकठिकाणी खड्डे पडलेले होते. त्यामुळे येथे डांबरीकरणाचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग B & C योजनेअंतर्गत तयार व्हायला सुरुवात झाला आहे. या रस्त्याचे कंत्राट गोंदिया येथील एका कन्स्ट्रक्शनला मिळाले आहे. परंतु, कंत्राटदार रस्त्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे करीत आहे. रस्त्यावरचे डांबर गायब झाले आहे. फक्त तिथे गिट्टी आणि चुरी टाकली जात आहे. त्यामुळे हा रस्ता अल्पावधीतच उखडून जाईल, असे बोलले जात आहे. दरम्यान, संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी सदर रस्त्याचे काम दर्जेदार होईल, याकडे लक्ष द्यावे व त्यांचे बील देयके थांबविण्यात यावे अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रिया
सदर रोड कसा बनत आहे याची मी स्वतः स्पॉट वर जाऊन पाहणी करणार व कंत्राट दाराला चांगल्या दर्जाचा रोड बनवायला सांगणार.

कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग (B & C) तिरोडा
अभिजित खंडाळकर

Leave a Comment