Home » जीवनशैली » सामाजिक » महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा तिरोडाचे वतीने खासदार प्रफुलभाई पटेल यांना माजी आमदार राजेंद्रजी जैन तथा अध्यक्ष गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यामार्फत संपूर्ण गोंदिया जिल्हा आदिवासी उपयोजन क्षेत्रामध्ये सहभागी करून घेण्याबाबत देण्यात आले निवेदन………..

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा तिरोडाचे वतीने खासदार प्रफुलभाई पटेल यांना माजी आमदार राजेंद्रजी जैन तथा अध्यक्ष गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यामार्फत संपूर्ण गोंदिया जिल्हा आदिवासी उपयोजन क्षेत्रामध्ये सहभागी करून घेण्याबाबत देण्यात आले निवेदन………..

Share:

 

तिरोडा  9 मार्च 1990 च्या शासन निर्णयनुसार गोंदिया जिल्ह्यातील देवरी,सालेकसा, अर्जुनी मोरगाव,सडक अर्जुनी इत्यादी तालुके आदिवासी उपयोजन क्षेत्र म्हणून घोषित असून उर्वरित तिरोडा,गोंदिया,गोरेगाव, आमगाव इत्यादी तालुके आदिवासीबहुल,जंगलव्याप्त असून सुद्धा आदिवासी उपयोजना क्षेत्रामध्ये सहभागी नाहीत.त्यामुळे संपूर्ण गोंदिया जिल्ह्याचा विचार करता येथील आदिवासी जनजातीचे प्राबल्य, शिक्षण,आरोग्य,दरडोई उत्पन्न,बेरोजगारी,इत्यादी बाबी लक्षात घेता संपूर्ण गोंदिया जिल्हा आदिवासी उपयोजन क्षेत्रामध्ये सहभागी करून घ्यावा. व जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडून अधिकाधिक निधी मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा तिरोड्याच्या वतीने खासदार प्रफुलभाई पटेल यांना माजी आमदार राजेंद्रजी जैन तथा अध्यक्ष गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी शिक्षक संघाचे उमाशंकर पारधी, राजू गुन्नेवार,अरविंद उके, यू.पी.बिसेन, के.एस. रहंगडाले, एन.डी.पटले, शितल कुमार कनपटे,विजय पारधी, रविकिरण ढोरे, प्रेमकुमार रहांगडाले जिल्हा अध्यक्ष NCP गोंदिया, जगदीश (बालु) बावनथड़े जिल्हा परिषद सदस्य व तिरोडा तालुका अध्यक्ष NCP, शैलेंद्र कोचे, रविकुमार (बंटी) पटले माजी सरपंच व विजय बिंझाडे पंचायत समिति सदस्य इत्यादी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Leave a Comment