Home » शिक्षात्मक » शिक्षण » शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये जी.प. सदस्य किरणभाऊ पारधी एक हात मदतीचा

शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये जी.प. सदस्य किरणभाऊ पारधी एक हात मदतीचा

Share:

 

तिरोडा – गोर गरीब जनतेच्या हितासाठी नेहमी लढत असणारे व्यक्ती म्हणजे किरण पारधी.
शिक्षणाशिवाय तरणोपार नाही, शिकाल तर शिकाल असा संदेश ते नेहमी मग तो कुठे धार्मिक कार्यक्रम असो, किंवा कुठल्याही शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा समाज प्रभोदनाचे कार्यक्रम असो तिथे नेहमी सांगत असतात.
दि. 1 ऑगस्ट 2025 रोज शुक्रवार ला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याची जंयती मुंडीकोटा रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबा साहेब आंबेडकर, ज्योतीबा फुले, भगवान गौतम बुध्द याच्या स्मारक मध्ये पुजा अर्जणा करून साजरी करण्यात आली.
माजी. जि.प. सदस्य मनोजभाऊ डोंगरे यांनी दोन दिवसापूर्वी जि.प. सदस्य किरणभाऊ पारधी यांच्याशी फोन संवाद साधून काही गावच्या काही समच्या सांगीतल्या होत्या त्यावर किरणभाऊ यांनी कोणतीही समस्या असेल ती आपण सोडवू असे सांगीतले, समच्या असी होति की गावातीलच 1 मुलगी इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेत आहे. तिला शिक्षण घेण्याकरिता दुसऱ्या गावी 5 किलोमीटर पायी जावे लागत होते. त्यामुळे त्या मुलीला शाळेत ये – जा करण्याकरिता त्रास सहन करावा लागत होता. तिची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे ति सायकल घेऊ शकत नव्हती ही बाब माजी जी. प. सदस्य मनोजभाऊ डोंगरे यांनी वर्तमान जी.प.सदस्य किरणभाऊ पारधी यांच्या लक्षात आणून दिली व त्यांनी आज 1 ऑगस्ट ला त्या मुलीला स्वखर्चातून 1 सायकल भेट दिल्याने त्या मुलीच्या चेहऱ्यावर हास्य बघायला मिळाले.
स्वतः मुलीने, मुलीच्या आई – वडिलांने तसेच माजी जी.प. सदस्य मनोजभाऊ डोंगरे तसेच गावातील नागरिकांनी जी.प.सदस्य किरणभाऊ पारधी यांचे मनापासून खुप खुप आभार मानले.
याप्रसंगी जि.प. सदस्य किरणभाऊ पारधी, मा.जि.प.सदस्य मनोजभाऊ डोंगर, प्रकाश शेंडे, सौ. मिनामी डोंगर, मंजू बिरजू नाळे, 10 व्या वर्गात शिकणाऱ्या मुली,कैशोभाऊ भोयर, मुनेश शेंडे, सफी शेख, अजय उके, अशोक कांबळे, मोहमद शेख, संजू ठाकुर उपस्थित होते.

यावेळी किरणभाऊ नी सांगितले की आजच्या काळामध्ये शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये. जिवणामध्ये आपल्याला आपला आणि आपल्या परिवाराचा उद्धार करायचा असेल तर आपल्याला शिक्षन घ्यावे लागेल,
शिक्षणामुळेच माणसाची प्रगती होते त्यामुली शिक्षण शिकणे अत्यंत महत्वाचे आहे. जो शिकेल तोच टिकेल. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. कारण की भारतीय राज्यघटनेचे निर्माता, शोषित वंचित, पीडित यांना न्याय, त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटणारे, दलितांचे कैवारी भारतीय संविधानात स्त्री – पुरुष यांना सामान अधिकार देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही नाही असे यावेळी किरणभाऊ यांनी सांगितले. कोणतीही समस्या असल्यास मला सांगा मी ति पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन असे सांगीतले.

Leave a Comment