अखेरचे अद्यतनित:
सुनिताने पोलिसांनी दिलेल्या जबाबनुसार ती पिओकेमध्ये नोकरी शोधण्यासाठी गेली होती.

नागपूर : पाकिस्तानात जाण्यासाठी एलओसी ओलांडणाऱ्या नागपुरच्या सुनीता जामगडेचा मुलगा अखेर नागपुरात पोहोचला आहे. मात्र सुनिताला हेरगिरीच्या संशयावरून पोलिसांनी अटक केली आहे. सुनिता पाकिस्तानातील तीन नागरिकांच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती संपर्कात होती. एवढच नाही तर सुनिता आणि तिच्या मुलाने पोलिसांना वेगळी माहिती दिली आहे, त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला आहे.
नागपुरची सुनिता इन्स्टाग्रामवरून पाकिस्तानच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ती झुल्फिकर, असद आणि तौफिक या तिघांच्या सतत संपर्कात ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस तपासात सुनिता वारंवार जबाब बदलत आहे. सुनिताचा मोबाईल देखील पोलिसांनी जप्त केला आहे. मात्र तो फोन तिने फॉर्मॅट केल्याचे समोर आले आहे. सुनिताने पोलिसांनी दिलेल्या जबाबनुसार ती पिओकेमध्ये नोकरी शोधण्यासाठी गेली होती.
अखेर आज मुलगा नागपुरात
नागपूर येथील 43 वर्षीय महिला 15 मे रोजी लडाखमधील कारगिल जिल्ह्यातील शेवटच्या गावातून रहस्यमय परिस्थितीत बेपत्ता झाली होती. सुनिता बेपत्ता झाल्यानंतर बॉर्डरवर मुलाला एकटं सोडल्यानंर कारगीलमधील बालकल्याण समितीच्या ताब्यात मुलगा होता. अखेर आज मुलगा नागपुरात पोहचला आहे. त्याला नागपुरात आणण्यासंदर्भात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नागपुरात आणण्यात आले.
सुनीतावर पोलिसांचा संशय
मिळालेल्या माहितीनुसार सुनीताने पोलिसाला दिलेली माहिती आणि तिच्या मुलाने दिलेली माहिती यात विरोधाभास असल्याचं समोर आहे. दोघांच्या वेगवेगळ्या माहितीमुळे सुनीतावर पोलिसांचा संशय वाढला आहे. नागपूर पोलिसांनी शासकीय अधिनियमांसह विविध कलमान्वये सुनितावर गुन्हा दाखल केला आहे.
सुनिताची मानसिक स्थिती अस्थिर
कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनीता सुरुवातीला नर्स म्हणून काम करत होती. त्यानंतर ती कपडे शिवण्याचं काम करायची तिची मानसिक स्थिती अस्थिर असून तिच्या नागपूरतील रुग्णालयात उपचार सुद्धा सुरू होते. नागपुरातून निघताना ही तिने आपल्या कुटुंबीयांना अंधारात ठेवले होते. तर मुलाला कपडे घेऊन देते असं सांगून सुनीता घरातून बाहेर गेल्याची माहिती आहे,
नागपूर, महाराष्ट्र
जून 02, 2025 3:55 दुपारी आहे







