Home » शिक्षात्मक » शिक्षण » अक्षय कुमार आणि नाना पाटेकरची फुगडी, ‘हाऊसफुल 5’ प्रमोशनवेळी एकच कल्ला! पाहा Video

अक्षय कुमार आणि नाना पाटेकरची फुगडी, ‘हाऊसफुल 5’ प्रमोशनवेळी एकच कल्ला! पाहा Video

Share:

अखेरचे अद्यतनित:

Akshay Kumar-Nana patekar: ‘हाऊसफुल 5’ या बहुप्रतिक्षित कॉमेडी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीम नुकतीच पुण्यात पोहोचली, आणि काय धमाल उडाली ती पाहणाऱ्यांना विसरता येणार नाही.

अक्षय कुमार आणि नाना पाटेकरची फुगडीअक्षय कुमार आणि नाना पाटेकरची फुगडी
अक्षय कुमार आणि नाना पाटेकरची फुगडी

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आपल्या हटके स्टाईलसाठी ओळखला जातो आणि यावेळीही त्याने प्रेक्षकांना खूश करण्याची एकही संधी सोडली नाही. ‘हाऊसफुल 5’ या बहुप्रतिक्षित कॉमेडी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीम नुकतीच पुण्यात पोहोचली, आणि काय धमाल उडाली ती पाहणाऱ्यांना विसरता येणार नाही. अक्षय कुमारने नाना पाटेकरांसोबत फुगडीही खेळली.

‘हाऊसफुल 5’ प्रमोशनवेळी अक्षयने गर्दीत उतरून, चाहत्यांसोबत पारंपरिक फुगडी नृत्य केले. हा अनोखा आणि मजेशीर क्षण पाहून सगळे फिदा झाले. यावेळा अक्षयने 74 वर्षीय नाना पाटेकरांसोबतही फुगडी खेळली. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

नाना आणि अक्षयच्या या व्हिडीओवर चाहते भरभरुन लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. दोघांच्या जोडीला भरभरुन प्रेम देत आहेत. काहींना वेलकममधील त्यांची जोडी आठवली.

‘हाऊसफुल 5’ केवळ स्टारकास्टमुळे नव्हे, तर त्याच्या दोन क्लायमॅक्समुळेही चर्चेत आहे! होय, या चित्रपटात एक नाही तर दोन शेवट आहेत ‘हाऊसफुल 5A’ आणि ‘हाऊसफुल 5B’. प्रेक्षकांना तिकीट घेताना निवड करता येणार आणि त्यामुळे प्रत्येकाला वेगळा अनुभव मिळणार. दरम्यान, या अफलातून कलाकृतीचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी करत आहेत, तर निर्मिती साजिद नाडियाडवाला यांची आहे. 6 जून रोजी ‘हाऊसफुल 5’ सिनेमा थिएटरमध्ये हसवायला येत आहे.

Source link

Leave a Comment