तिरोडा – रस्त्याचा विकास व्हावा, नागरिकांना आवागमन करताना त्रास नको, याकरिता सरकार विविध योजनेअंतर्गत रस्ते बनवित असते. परंतु, सरकार रस्ते बनविण्याकरिता ज्या कंत्राटदारांना टेंडर देत असते ते कंत्राटदार नित्कृष्ट दर्जाचे रस्ते बनवित असल्याचे सालेबर्डी ते देव्हाडा खुर्द रस्त्याच्या बांधकामावरून दिसून येते.
तिरोडा तालुक्यातील सालेबर्डी ते देव्हाडा खुर्द हा रस्ता फुटलेला होता. ठिकठिकाणी खड्डे पडलेले होते. नागरिकांना ये -जा करण्याकरिता नागरिकांना ये – जा करण्याकरिता खुप जास्त कमालीचा त्रास सहन करावा लागत होता.
त्यामुळे येथे डांबरीकरणाचा रस्ता तर काही ठिकाणाहून सिमेंट रस्ता प्रधानमंत्री सडक योजने अंतर्गत बनविणे सुरवात केली आहे. या रस्त्याचे कंत्राट तिरोडा येथील एका कन्स्ट्रक्शनला मिळाले आहे. परंतु, कंत्राटदार रस्त्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे करीत आहे. रस्त्यावर फक्त गिट्टीच गिट्टी दिसत आहे. गिट्टी प्रॉपर पद्धतीने दाबताना दिसत नाही आहे आणि चुरी टाकली जात . त्यामुळे हा रस्ता अल्पावधीतच उखडून जाईल, असे बोलले जात आहे. दरम्यान, संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी सदर रस्त्याचे काम दर्जेदार होईल याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
व सदर कंत्राट दाराचे बील देयके थांबविण्यात यावे अशी मागणी होत आहे.
प्रतिक्रिया
1. रस्ता बांधकामस्थळी मी स्वतः जाऊन पाहणी करेल. काही त्रुटी आढळल्यास निश्चित कारवाई केली जाईल.
*कनिष्ठ अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तिरोडा*
येळे जी
2 सदर कंत्राटदाराणे रोड नित्कृष दर्जाचा न बनविता चांगल्या क्वालिटी. चे बनवून पावसाळ्या आधी पूर्ण करण्याचे प्रयत्न करावे जेणे करून तिरोडा ते तुमसर बससेवा पूर्वरत सुरु होईल जेणे करून त्या रोडवर असलेल्या गावाच्या विद्यार्थ्यांना शाळेत ये – जा करण्याकरिता अडचण निर्माण होणार नाही. तसेच रोडाचा काम इस्टीमेट नुसार न केल्यास सदर कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री सडक योजना गोंदिया यांना कंत्राटदाराचे बील देयके थांबविण्यात यावे असा पत्र देणार. ज्या गावातून रस्ता बनत आहे त्या ठिकाणी पावसाचे पाणी सहज वाहून जाईल अशी निकासी करुन द्यावी.. संबधित ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या सी येणाऱ्या अडचणी दुर करण्यासाठी आवश्यक उपाय योजणा करुन द्यावी.
*जिल्हा परिषद सदस्य गोंदिया (कवलेवाडा क्षेत्र तिरोडा)*
किरण पारधी







