Home » शिक्षात्मक » शिक्षण » पत्रकार संघातर्फे सुधा गिरिपुंजे यांचा सत्कार जिद्द, सातत्य व आत्मविश्वास यामुळेच मी यश संपादन केले . सुधा गिरीपुंजे

पत्रकार संघातर्फे सुधा गिरिपुंजे यांचा सत्कार जिद्द, सातत्य व आत्मविश्वास यामुळेच मी यश संपादन केले . सुधा गिरीपुंजे

Share:

तिरोडामहाराष्ट्र पत्रकार संघ शाखा तिरोडा तालुका तसेच मराठी पत्रकार संघ शाखा तिरोडा तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच लागलेल्या नीट परीक्षेच्या निकालात सुधा गिरीपुंजे सहकार नगर तिरोडा या विद्यार्थिनीने 558 गुण घेऊन ऑल इंडिया रँक 9045 व ओबीसी कॅटेगिरी मधून 3729 रँक प्राप्त करून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज (जी. एम. सी.) मध्ये आपला प्रवेश निश्चित केला केला . त्याबाबत तिच्या सत्कार शहीद मिश्रा कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संजीव कोलते यांच्या अध्यक्षतेखाली ,महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अजय नंदागवळी व मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दीपक जयस्वाल यांच्या हस्ते सुधा गिरीपुंजे यांचा पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे मार्गदर्शक तथा प्राचार्य डी आर गिरीपुंजे, प्राचार्य तथा पत्रकार कमल कापसे ,भरत बीसेन ,राजेंद्र भांडारकर, पवन वासनिक, मराठी पत्रकार संघाचे तालुका सचिव सुबोध बैस यांची उपस्थिती प्रामुख्याने होती.

यावेळी सुधा गिरीपुंजे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले की जिद्द , सातत्य व आत्मविश्वास यामुळे मी यश संपादन केले. मी माझ्या यशाची श्रेय माझे बाबा प्राचार्य तथा पत्रकार डी आर गिरीपुंजे आई मुख्याध्यापिका डी.डी. गिरीपुंजे तसेच माझे मोठे बंधू डॉक्टर संकल्प गिरीपुंजे यांना देते.
शहीद मिश्रा कनिष्ठ महाविद्यालय तिरोडाचे माजी प्राचार्य संजीव कोलते यांनी सांगितले की सुधा गिरीपुंजे यांनी फादर डे च्या दिवशी वडिलांना नीट परीक्षेत 558 गुण व ऑल इंडिया रँक 9045 घेऊन छान तोफा दिला. सुधाची उत्तरोत्तर प्रगती व्हावं अशी मनोकामना व्यक्त केली, तर पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक जयस्वाल व अजय नंदागवळी यांनी सुधाला भविष्याच्या सुखद व प्रगतिशील वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य कमल कापसे, प्रास्ताविक भरत बिसेन ,आभार प्रदर्शन आर .बी. भांडारकर यांनी केले.

Leave a Comment