Home » शिक्षात्मक » शिक्षण » मुंडीकोटा येथे महास्वराज अभियान दिनानिमित्त शिबिराचे आयोजन

मुंडीकोटा येथे महास्वराज अभियान दिनानिमित्त शिबिराचे आयोजन

Share:

तिरोडा – महसुली वर्षांमध्ये महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान व पारदर्शक करणे यासाठी महास्वराज अभियान एक जून 2025 ते 31 जुलै 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे गाव पातळीवर शैक्षणिक परियोजनासाठी दाखले व नागरिकांना द्यावयाच्या सोयी सुविधा अंतर्गत काल 18 जून ला सुभाष विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय मुंडीकोटा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले त्या अनुषंगाने शालेय विद्यार्थी त्यांचे जाती प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, पदीनिवास दाखला,व इतर दाखले तयार करण्यात येणार आहेत त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना दाखले तयार करण्याकरिता लागणारे दस्ताऐवज याबाबत शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी पूर्ण तयारी करून कागदपत्रे गोळा ठेवण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. शिवाजी महाराज अभियान अंतर्गत राशन कार्ड,आधार कार्ड, पॅन कार्ड, नॉन क्रिमिलियर,अशा अनेक प्रकारचे लोक पयोगी दाखले देण्यात यावे याकरिता महसूल विभागाकडून समाधान शिबिराच्या आयोजन करण्यात आलेले होते.. कार्यक्रमांचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी श्रीमती पूजाताई गायकवाड, नारायण ठाकरे तहसीलदार तीरोडा, मां.श्री. किरणभाऊ पारधी जि.प.सदस्य तसेच प.स.सदस्य सौ.वनिता ताई भांडारकर, सरपंच प्रतिमा जैतवर, ग्राम पंचायत सदस्य गन, गावकरी मंडळी, बाहेर गावावरून आलेले नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Comment