
तिरोडा – रस्त्याचा विकास व्हावा, नागरिकांना आवागमन करताना त्रास नको, याकरिता सरकार विविध योजनेअंतर्गत रस्ते बनवित असते. परंतु, सरकार रस्ते बनविण्याकरिता ज्या कंत्राटदारांना टेंडर देत असते ते कंत्राटदार नित्कृष्ट दर्जाचे रस्ते बनवित असल्याचे तिरोडा येथिल बरबसपुरा ते इंदोरा खुर्द रस्त्याच्या बांधकामावरून दिसून येते.
बरबसपुरा ते इंदोरा खुर्द रोड हा फुटलेला होता त्यामुळे तिथे सार्वजनिक बांधकाम विभाग (B&C) योजने अंतर्गत नवीन रोड बनायला सुरुवात झाली रोड पूर्ण तयार झाला सुद्धा परंतु 1 महिन्याच्या कालावधीतच रस्त्याला खड्डे पडले आणि रस्ता उखडून सुद्धा गेला.
तरी पण संबंधित विभागाने रोडाची पाहनी करून संबंधित कंत्राटदाराचे बील देयके थांबिवण्यात यावे अशी जन माणसात चर्चा आहे.
प्रतिक्रिया
या ठिकाणी पाईप लाईन टाकली होती वॉटर लीकेज आहे. त्याला दुरुस्त करणार आहो.
कनिष्ठ अभियंता दमाहे
सार्वजनिक बांधकाम विभाग (B&C) उपविभाग तिरोडा








