Home » शिक्षात्मक » शिक्षण » आपण नेहमी गावाच्या हितासाठी सदैव तत्पर *जी.प. सदस्य किरण पारधी*

आपण नेहमी गावाच्या हितासाठी सदैव तत्पर *जी.प. सदस्य किरण पारधी*

Share:

                       अगोदरचा रस्ता

तिरोडा -ग्रामपंचायत मुंडीपार येथील सरपंच, उपसरपंच आणि गावकरी लोकांनी जि.प.सदस्य किरणभाऊ पारधी यांच्याकडे मागणी केली की गावामध्ये सिमेंट रस्ता आहे पण या ठिकाणी नाली नसल्यामुळे रोडावर पाणी साचत राहते त्यामुळे तिथून जात असताना गुटक्याच्या वर पाणी होत होता येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे पाण्यात पाय भिजत होते लहान मुलं शाळकरी विद्यार्थी चिखल झाल्यामुळे त्या ठिकाणी पडण्याची भीती होती काही विद्यार्थी छोटे छोटे मुले रस्त्यावर पाणी असल्यामुळे शाळेत सुद्धा जात नव्हते म्हणजेच अनेक प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी निर्माण झालेल्या होत्या सरपंच उपसरपंच काही गावकरी लोकांनी किरणभाऊ पारधी, यांची भेट घेतली गावातील समस्या तात्काळ मार्गी लावन्याची विनवणी केली त्यावर जि.प.सदस्य किरणभाऊ यांनी तुमची अडचण आपण तत्काळ दूर करू असे आस्वासन दिले फक्त तुमच्या साथ असू द्या असे बोलले. त्यानंतर त्यांनी *स्वखर्चाने* लगेच रोडासाठी लागणारा सर्व मटेरियल,साहित्य आणि काम करणारा ठेकेदाराला सुद्धा बोलाविला आणि लगेच एका दिवसानंतर कामाला सुरुवात झाली काम दोन दिवसांमध्ये पूर्ण झाले.
सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिकांनी किरणभाऊ चे खुप खुप अभिनंदन केले. यावेळी किरणभाऊ म्हणाले की कोणतीही समस्या असो ती आपण दूर करण्याच्या प्रयत्न करू व भविष्यात सुद्धा करू असे यावेळी सांगितले.

Leave a Comment