Home » शिक्षात्मक » शिक्षण » जी. प. सदस्य किरणभाऊ पारधी यांनी केला जी. प. क्षेत्राचा दौरा क्षेत्रातील विविध समस्या घेतल्या जाणून

जी. प. सदस्य किरणभाऊ पारधी यांनी केला जी. प. क्षेत्राचा दौरा क्षेत्रातील विविध समस्या घेतल्या जाणून

Share:

तिरोडा  –  जि.प. सदस्य किरणभाऊ पारधी यांनी जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांना भेटी देवून नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान विविध अडी-अडचणी व समस्या जाणून त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

जिल्हा परिषद सदस्य किरणकुमार पारधी १३ जुलै रोजी क्षेत्राच्या भेटीवर निघाले. दरम्यान नागरिकांची भेट घेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मांडवी येथील बोरवेल मागील दोन महिन्यापासून बंद पडलेली आहे ती लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावी, नाली बांधकामाला घेवून विभागाच्या अधिकाऱ्याशी र्चा केली. त्याचप्रमाणे शेतीचे नुकसान बाबत शेतकऱ्यांच्या विविध प्रकारचे समस्या, दानाचे बोनस मिळणार की नाही, यावर सुद्धा चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना ज्यांचे नोंदणी झालेल्या तसेच सर्वांना बोनस एक-दोन दिवसांमध्ये मिळणार आहेत, असे आश्वासन देण्यात आले. मुंडीकोटा, भंबोडी, बिरोली, रस्ता पाहणी केली. तर सालेबर्डी, घोगरा येथील पुराची पाहणी करून शेतकरी व सर्वसामान्यांना नुकसान भरपाई मिळेल, यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांची चर्चा करून पंचनामे तयार करण्याचे सांगितले. सर्व समस्यांची तातडीने दखल घेवून लवकरात लवकर सोडविता येतील, असे आश्वासन दिले.

Leave a Comment