
अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्षाशी चर्चा करताना जगदीशजी बावनथडे
तिरोडा – आज दिनांक 28 जुलै 2025 रोज सोमवारला अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष मा. दौलतजी दरोडा यांची आज शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे भेट घेतली व तिरोडा तालुक्यातील आदिवासी विकास कामाबाबत चर्चा केली तसेच तिरोडा तालुका नक्षलग्रस्त घोषित करण्यात यावे अशी मागणी केली त्यामुळे तिरोडा तालुक्यातील अनेक कर्मचारी, अधिकारी यांना विविध योजनेच्या सुविधा लागू होतील.तसेच तिरोडा तालुक्यातील अनेक गावांना सुद्धा याचा फायदा होईल सदर बाबीवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून अध्यक्ष साहेब यांनी सर्व बाबी समजून घेऊन समाधानकारक उत्तर दिले असून आम्ही लवकरच या सगळ्या विषयावर चर्चा करून मार्ग काढू असे आश्वासन दिले.तसेच पवन कुमार जोंग आय.एफ.एस ( ifs ) अधिकारी गोंदिया यांच्या सोबत तिरोडा तालुक्यातील अनेक विषयावर चर्चा करण्यात आली असून एम.टी.डी.सी. बोदलकसा व चोरखमारा येथील पर्यटन विकास कामाबाबत चर्चा करण्यात आली असून सदर विकासाचे कामे मंजूर करण्यात येतील असे आश्वासन दिले.
जर विकासाची कामे मंजूर झाली तर आपल्या परिसराच्या विकास कामाला मोठ्या प्रमाणात गती मिळेल व क्षेत्राचा विकास होईल. यावेळी उपस्थित मा.प्रेमकुमार रहांगडाले जिल्हाअध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदिया, मा. नानूजी मुदलीवार शहर अध्यक्ष गोंदिया, मा.करनजी टेकाम आदिवासी नेता, मा.अशोकजी सहारे सामाजिक कार्यकर्ता व आदिवासी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







