Home » शिक्षात्मक » शिक्षण » पंचायत समिती स्तरावरील विविध योजनेच्या लाभ घ्या सभापती तेजराम चव्हाण

पंचायत समिती स्तरावरील विविध योजनेच्या लाभ घ्या                सभापती तेजराम चव्हाण

Share:

 

तिरोडा – पंचायत समिती तिरोडा मार्फत राबविण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद स्तरावरील विविध शासकीय योजनां संबंधाने सभापती तेजराम चव्हाण यांनी आपल्या कार्यालयात पंचायत समिती स्तरावरील विविध योजना, योजनेचा लाभ घेण्याकरीता लागणारे कागजात व योजनेचे फायदे या बाबतीत आदर्श मत्स्यपालन सहकारी संस्था मर्या. मेंदिपूर र.नं.८४६ ता.तिरोडा जिल्हा-गोंदिया या संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांना मोलाचे मार्गदर्शन करून माहिती उपलब्ध करून दिले.

संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांना उपयुक्त असे मार्गदर्शन केल्याबद्दल संस्थेचे वतीने सभापती तेजराम चव्हाण यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
या वेळी प्रामुख्याने संस्थेचे अध्यक्ष- मंसाराम उईके, उपाध्यक्ष- रामचंद तुमसरे, सचिव- किशोर तुमसरे व इतर पदाधिकारी व सभासद हजर होते.

Leave a Comment