
तिरोडा – रक्षाबंधनच्या पावन पर्वावर दि. 11 ऑगस्ट 2025 ला ग्रामपंचायत कार्यालय करटी खुर्द येथे जल शुद्धीकरण केंद्राचे (आरोचे) उद्घाटन जि. प .सदस्य किरणभाऊ पारधी त्याचप्रमाणे प.सं सदस्य जितेंद्र चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले सीएसआर फंडातून लोकांना शुद्ध पाणी मिळेल याकरिता ग्रामपंचायत स्तरावर पाठपुरावा करण्यात आले होते .कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच पंजाबजी उकुंडे, उपसरपंच अमोल गावंडे सर्व ग्रामपंचायत सदस्य,माजी सरपंच माजी उपसरपंच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची शोभा वाढविण्याकरता शाळेतील विद्यार्थी सर्व शिक्षक गण उपस्थित होते .अदानी फाउंडेशनच्या वतीने आरोग्याच्या विचार व्हावा लोकांचे आरोग्य नेहमी चांगले राहावे याकरिता शुद्ध पाणी पाणी मिळावे ही भावना होति. कार्यक्रमाप्रसंगी अदानी फाऊंडेशनचे प्रमुख माननीय श्री. विमल पटेल सर, राहुल सर ,स्वप्निल सर, उपस्थित मांडवी सरपंच तुरेन्द्र नागपुरे उपस्थित होते. अदानी फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण भागात बऱ्याच सुख सोयी ची कामे करण्यात येतात .पाच रुपयांमध्ये वीस लिटर पाणी मिळणार आहे पाणी येण्याकरता जार सुद्धा फ्री मध्ये देण्यात येणार आहे .24 तास पाण्याची उपलब्धता राहणार आहे असे यावेळी अडाणी फाउंडेशनचे प्रमुख बिमूल पटेल यांनी सांगितले.
त्यामुळे त्यांचे ग्रामपंचायत च्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करण्यात आले.








