Home » शिक्षात्मक » शिक्षण » गोंदिया जिल्हा मराठी माध्यमिक शिक्षा संघाच्या वतीने कार्यशाळा व गुणवंतांचा सत्कार समारंभ विद्यार्थ्यांनी मिळवलेली गुणवत्ता ही त्यांच्या मेहनतीचे तसेच शिक्षकांच्या अथक प्रयत्नांचे फलित आहे . लायकराम भेंडारकर

गोंदिया जिल्हा मराठी माध्यमिक शिक्षा संघाच्या वतीने कार्यशाळा व गुणवंतांचा सत्कार समारंभ विद्यार्थ्यांनी मिळवलेली गुणवत्ता ही त्यांच्या मेहनतीचे तसेच शिक्षकांच्या अथक प्रयत्नांचे फलित आहे . लायकराम भेंडारकर

Share:

 

तिरोडा – गोंदिया जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या वर्ग नववी व दहावीला मराठी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांच्या कार्यशाळेचे तसेच गुणवंत शिक्षक व वर्ग दहावीच्या परीक्षेत 90 व 90 पेक्षा जास्त मराठी विषयात गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते ,संघाचे अध्यक्ष घनश्याम पटले यांचे अध्यक्षतेखाली ,जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती सुरेश हर्षे ,जिल्हा परिषद गोंदियाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन फरेंद्र कुर्तीकर ,संघाचे माजी अध्यक्ष ,पत्रकार तथा प्राचार्य डी .आर .गिरीपुंजे, कार्यवाह दुधराम राऊत, कार्याध्यक्ष प्राचार्य के एस वैद्य, संघाचे सदस्य एम डी सोनेवाने, काकाजी मडावी ,जी एम येडे, मुख्याध्यापक बी पी टेंभुर्णे, शकुंतला पटले ,यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद गोंदियाच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

यावेळी गोंदिया जिल्ह्यातून वर्ग दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मराठी विषयात 90 व 90 पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन याप्रसंगी पाहुण्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला ,तसेच मराठीचे शिक्षक त्यांनी विविध कार्यक्रमात उत्कृष्ट गीत पोवाडा भजन कविता असे साहित्य सादर केले त्यांचा सुद्धा पाहुण्यांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्यात खालील शिक्षकांच्या समावेश होता.
आर.एन.चौधरी ( *पोवाडा* )
सुदामा हाय.आसोली.ता.गोंदिया.
,महेन्द्र सोनेवाने ( *स्वरचित कविता)*
शहीद जा.ति.जि.प.हाय.गोरेगाव.
.काकाजी मडावी ( *स्वरचित कविता* )
हरिहर भाई पटेल हाय.चिरचाळबांध .
, मोतीलाल बिसेन ( *स्वरचित कविता* )
श्यामाप्रसाद हायस्कूल महागाव,
,.विष्णू भोंडवे ( *फटका* )
, तुकाराम हायस्कूल व क.म.भोसा.
,.माधवी हुमे ( *स्वरचित कविता)*
बहुउद्देशीय हायस्कूल अर्जुनी/ मोर.
,.सविता मेश्राम ( *भारूड* )
नगरपरिषद गांधी विद्यालय तिरोडा.,करुणा दहिवले( *कविता गायन)*
मा.सुधाकरराव नाईक विद्यालय बोडदे करड.
,संदीप राठोड ( *गवळण, अभंग)*
राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय सतोना ता.गोंदिया.
,शृती पाडेकर ( *शोधनिबंध* )
जि.प.भारतीय विद्यालय एकोडी.
,ललीता तुळशीराम तिरगम (भावगीत)
ता.गोरेगाव.
,तुळशीराम तिरगम ( *गवळण)*
रामकृष्ण विद्यालय कु-हाडी .
,वंदना बिसेन ( *स्वरचित कविता)*
नुतन विद्यालय गोंदिया.,.हंसराज मिताराम चौरे.( *भक्तीगीत* )
श्री तुकाराम हाय. व क.म.भोसा., गेडाम ( *गवळण* )
मानवता विद्यालय बोंडगावदेवी.
,एस.एन.बोरकर ( *भावगीत* ).
मानवता विद्यालय बोंडगावदेवी.
,ओ.जे.कटरे.( *भक्तीगीत* )
फुलचूर हायस्कूल फुलचूर.
,.एस.एम.भांडारकर ( *अभंग* )
डॉ.आंबेडकर विद्यालय नवेगावबांध.
,आर.यु.बागळकर ( *भावगीत* )
सुरेश मेंढे ( *भक्तीगीत* )
श्री तुकाराम हाय.व क.म.भोसा.
यावेळी जिल्हा परिषदचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी सांगितले की आजचा हा कार्यक्रम म्हणजे केवळ सत्कार सोहळा नाही, तर आपल्या जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि संस्कृतीचा उत्सव आहे.

विद्यार्थ्यांनी परीक्षांमध्ये मिळवलेली गुणवत्ता ही त्यांच्या मेहनतीचं आणि त्यांच्या शिक्षकांच्या अथक प्रयत्नांचं फलित आहे. आपल्या या गुणवंत विद्यार्थ्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. तुमचं हे यश तुमच्यापुरतं मर्यादित नाही; ते तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या शाळेसाठी आणि अख्ख्या जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.

एक गोष्ट स्पष्ट आहे – विद्यार्थी घडतात ते शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे. आज ज्या शिक्षकांचा सन्मान होत आहे, ते शिक्षक म्हणजे ज्ञानदीप, समाजप्रबोधक आणि भविष्यास आकार देणारे शिल्पकार आहेत. शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवून त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसोबतच संपूर्ण शाळा आणि समाज घडवण्याचं काम केलं आहे. त्यांच्या या समर्पणबुद्धीला आणि सामाजिक बांधिलकीला मी मनापासून सलाम करतो.

आजच्या या कार्यक्रमातून मला हे वाटतं की, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील हे नातं अधिक बळकट व्हावं, आणि गुणवत्तेची परंपरा पुढे चालू राहावी.
आपण सर्वजण मिळून असा एक शिक्षणसंस्कारित, सशक्त आणि विकसित गोंदिया जिल्हा घडवू या, जिथे प्रत्येक मुलाला उत्तम शिक्षण मिळेल, आणि प्रत्येक शिक्षकाला सन्मान. तर यावेळी संघाचे अध्यक्ष घनश्याम पटले व जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांनी सुद्धा शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन यथोचित मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन हर्षदा राऊत प्रास्ताविक संघाचे कार्यवाह दुधराम राऊत तर आभार प्रदर्शन प्राचार्य के एस वैद्य यांनी केले .या समारोहाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले.

Leave a Comment