Home » शिक्षात्मक » शिक्षण » नवीन आंगणवाडी इमारतेवचे लोकार्पण संपन्न

नवीन आंगणवाडी इमारतेवचे लोकार्पण संपन्न

Share:

 

तिरोडा – मागील काही दिवसापासून ग्राम नवरगाव येथे आंगणवाडी जीर्ण अवस्थेत असून लहान मुलांना त्या आंगणवाडी मध्ये बसवायचे कसे असा प्रश्न पालकांसमोर निर्माण झाला होता. ही गोस्ट सौ. रजनीताई मिलिंद कुंभरे सभापती समाज कल्याण यांच्या लक्षात आली व त्यांनी लगेच पाठपुरावा करून ग्राम नवरगाव येथे अंगणवाडी ईमारत मुंजर करून दिली व त्याचे बांधकाम पुर्ण झाल्याने सौ. रजनी मिलिंद कुंभरे सभापती समाज कल्याण यांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले.व गावातील चिमुकल्या मुलांना शिक्षणाची आवड व बसण्याची सोय झाल्याने गावातील नागरीकांनी सौ. रजनीताई मिलींद कुंभरे सभापती समाजकल्याण यांचे शाल , श्रीफळ ,व पुष्प गुच्छ देऊन सत्कार केले .
यप्रसंगी सौ. कुंताताई पटले माजी सभापती तथा पं.स. सदस्य , सौ. प्रमीला जितेंद्र भलाई पं.स. सदस्य , प्रकाशजी ठाकरे सरपंच , रामप्रकाश पटले माजी सरपंच, पोर्णीमा समाधान राहांगडाले पोलीस पाटील, नरेश जी राहांगडाले तं . मु. अध्यक्ष, ग्रा पं . सदस्य पटले ताई , चचाने जी , सरला कोकुडे, सियानंद ठाकरे, अंगणवाडी सेविका कीरण ठवरे ,व गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Comment