तिरोडा – प्रकरण अशा प्रकारे आहे की दि. 12 ऑगस्ट ला दुपारी 12. वाजता ते 12.40 च्या दरम्यान लक्ष्मण दमाहे वय. 70 वर्षे रा. येड्माकोट व फुलवंतीबाई लक्ष्मण दमाहे वय 65 वर्षे रा. येड्माकोट हे येड्माकोट वरून मुंडीकोटा कडे जात असताना तिरोडा वरून तुमसरकडे जाणाऱ्या चारचाकी वाहन क्रं. MH 22 k 0990 च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व लापरवाहीने, चालवून लक्ष्मण दमाहे च्या मो.सा. ला समोरुन जोरात धडक दिली व चारचाकी चा चालक घटनास्थळवरून पसार झाला त्यामध्ये लक्ष्मण दमाहे व आयुशी बन्नाटे हिचा जागीच मृत्यू झाला तार फुलवंतीबाई दमाहे जखमी झाली मोहन भद्दू दमाहे यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन मा. ठाणेदार सा. यांचे आदेशाने सदरचा गुन्हा नोंद करुन तपासात घेतला आहे.
पुढील तपास सपोनि. मसराम पो.स्टे. तिरोडा हे करीत आहेत.








