Home » शिक्षात्मक » शिक्षण » मुंडीकोटा घोगरा चौकी येथे महास्वराज अभियान अंतर्गत शिबिर आयोजित* मांग गारुडी समाजाच्या लोकांना जाती प्रमाणपत्र व इतर दाखले वाटप

मुंडीकोटा घोगरा चौकी येथे महास्वराज अभियान अंतर्गत शिबिर आयोजित* मांग गारुडी समाजाच्या लोकांना जाती प्रमाणपत्र व इतर दाखले वाटप

Share:

 

तिरोडा महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयाअंतर्गत गाव पातळीवर शैक्षणिक प्रयोजनासाठी लागणारे दाखले व नागरिकांना द्यावयाच्या सोयी सुविधा यासाठी गाव ,पड़ा ,वस्ती सह गृहभेटी घेऊन विद्यार्थी व नागरिकांचे जाती प्रमाणपत्र ,नॉन क्रिमिलियर, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला,अधिनिवास दाखला व इतर दाखले देण्यात या पूर्ण नियोजनासाठी गृहभेटी व प्रमाणपत्र पुरवण्याबाबत महास्वराज अभियाना अंतर्गत घोगरा चौकी येथे शिबिर घेण्यात आले या शिबिरात विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक दाखले पुरवण्यात आले या शिबिरात प्रामुख्याने मुंडीकोटा महसूल विभागगातील कर्मचारी तसेच घोगरा चे सरपंच, उपसरपंच तसेच सदस्य, सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी या शिबिरासाठी मोलाची भूमिका बजावली.

2 सप्टेंबर 2024 ला कवलेवाडा जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य किरण भाऊ पारधी यांनी मांग गारुडी समाजाला जात प्रमाणपत्र देण्यात यावे याकरिता तिरोडा उपविभागीय अधिकारी तिरोडा यांना निवेदन सुद्धा दिले होते.
तसेच जिल्हापरिषद च्या सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा ह्या समाजाचा मुद्दा किरणभाऊ नी उपस्थित केला होता.

*प्रतिक्रिया*
मागील 1 वर्षांपासून मांग गारुडी समाजाला न्याय हक्क याची जाणीव व्हावी त्याचप्रमाणे शिक्षण शिकत असताना शिक्षणाला लागणारे कागदपत्रे आपल्याकडे उपलब्ध राहतील तर आपण समोरची पायरी गाठू शकतो त्याकरिता वारंवावर मांग गारुडी समाजांनी मला आमचे कागद पत्रे बनविण्यासाठी मदत करा असे मनाले.
त्यावर मीन उपविभागीय अधिकारी तिरोडा तसेच जिल्हाधिकारी गोंदिया, तहसीलदार तसेच जिल्हापरिषद च्या सर्वसाधारण सभेमध्ये मांग गारुडी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे त्याकरिता कॅम्प लावून घरपोच प्रमाणपत्र बनवून वितरित करण्यात यावे अशी मागणी केली असता जिल्हा परिषद चे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी माझ्या मागणीला प्रामुख्याने लक्षात घेतले लवकरात लवकर कॅम्प लावून प्रमाणपत्र वाटप होणार असल्यासाजे आश्वासन दिले होते व ते आज पूर्ण झाले. आपण नेहमी त्या समाजाकारिता प्रयत्नशील आहोत.
संपूर्ण जिल्ह्यात ही योजना प्रखरपणाने राबविण्यात यावी जेणे करून ह्या समाजातील लोकांना समोरचे भविष्य बनविण्याकरिता अडचण निर्माण होणार नाही. उदा. राशन कार्ड बनविणे, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमि्लीअर, घरकुल चा लाभ, गोठ्यांचा लाभ, लडकी बहीण योजनेचा लाभ अशाप्रकारचे अन्य लाभ घेण्याकरिता मदत होणार जेणे करून त्यांचा जिनमान उंचावेल.

जिल्हापरिषद सदस्य गोंदिया (कवलेवाडा क्षेत्र तिरोडा
                   किरणभाऊ पारधी

Leave a Comment