
गटविकास अधिकारी यांचे स्वागत करताना वरिष्ठ पत्रकार दीपक जायस्वाल, पत्रकार सुबोध बैस, गटशिक्षणाधिकारी स्नेहल रामटेके
तिरोडा– पंचायत समिती तिरोडा येथे अरुण गिरीपुंजे यांनी मंगळवार, १७ जून रोजी गटविकास अधिकारी (BDO) पदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी त्यांनी १८ महिन्यांपासून पंचायत समिती आमगाव येथे प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून यशस्वीपणे काम पाहिले आहे.पदभार स्विकारल्यानंतर तिरोडा पंचायत समितीच्या कार्यालयात स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी स्नेहल रामटेके, वरिष्ठ पत्रकार दीपककुमार जयस्वाल, सुबोध बैस, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बरीयेकर व जे. डी. अंबुले, तसेच प्रशासन अधिकारी रुद्रसेन रहांगडाले आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वांनी गिरीपुंजे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि तिरोडा तालुक्यातील विकास कार्यात त्यांच्या यशस्वी नेतृत्वासाठी शुभेच्छा दिल्या. गिरीपुंजे यांनी उपस्थितांचे आभार मानून तिरोडा तालुका सामाजिक, शैक्षणिक व ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अग्रगण्य होईल, असा विश्वास व्यक्त केला.








