
अशाप्रकारे रस्त्यावर रेती पसरलेली आहे
तिरोडा – रस्त्याचा विकास व्हावा, नागरिकांना आवागमन करताना त्रास नको, याकरिता सरकार विविध योजनेअंतर्गत रस्ते बनवित असते. परंतु, सरकार रस्ते बनविण्याकरिता ज्या कंत्राटदारांना टेंडर देत असते ते कंत्राटदार नित्कृष्ट दर्जाचे रस्ते बनवित असल्याचे तिरोडा तालुक्यातील खैरी रस्त्याच्या बांधकामावरून दिसून येते.
खैरी येथिल रोड हा फुटलेला होता त्यामुळे तिथे सार्वजनिक बांधकाम विभाग योजने अंतर्गत नवीन सिमेंट रोड बनायला सुरुवात झाली परंतु हा रोड नित्कृष्ट दर्जाचा होत असल्याचे दिसून येत आहे.
रोडावर फक्त रेती पसरवून ठेवली आहे.
त्यामुळे संबंधित विभागाने त्वरित रोडाची पाहनी करून संबंधित कंत्राटदाराचे बील देयके थांबिवण्यात यावे अशी जन माणसात चर्चा आहे.
प्रतिक्रिया,
सदर रोड हा कुठे बनत आहे, आणि कधी सुरु झाला आणि कोणत्या योजने अंतर्गत आहे याची मला कुठल्याच प्रकारची कल्पना नाही.
सरपंच सेलोटपार/खैरी
शिवकुमार शेंडे








