
तिरोडा – तालुक्यातील पांजरा तलावातून काल 26 जून पासून दिवसाढवळ्या व रात्रभर मुरमाची वाहतूक केली गेली व आज 27 जून ला सुद्धा मुरुमाची वाहतूक केली गेली.
याची माहिती तिरोडा तहसीलदार,महसूल प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी व तिरोडा पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस यांना मिळून सुद्धा कोणत्याच प्रकारची कारवाई झालेली नाही यामुळे ही कारवाई केवळ देवाणघेवाणमुळेच तर होत नाही ना असे निदर्शनास येते.
त्यामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
तालुक्यातील सरांडी गावालागत हायवे रोडाच्या बाजूला 1 खरडा मिल आहे तिथली जागा ही खोल असल्याने तिथे ह्या तलावातील नुरूम घातल्या जातो. तसेच तिरोडा येथील मुख्य चौकामधून दिवसाढवळ्या व रात्री मुरमाची वाहतूक केली जाते. त्याच चौकामधून दररोज महसूल, वनविभाग, पोलिस विभागाचे कर्मचारी ये-जा करीत असतात. तरीदेखील त्यांचे याकडे लक्ष नाही. महत्त्वाचे म्हणजे, याच चौकामध्ये दररोज एका पोलिसाची ड्युटी असते. व रात्रभर पेट्रोलिंग वर पोलिसांची गाडी फ़िरत असते त्यांनादेखील मुरमाचे ट्रॅक्टर, ट्रक दिसत नाही काय?
मुरूम चोर हे तलाव व महसूलच्या जागेमधून रात्रंदिवस मुरमाची चोरी करतात. तरी सुद्धा तिथल्या साझ्याच्या तलाठी ला याची माहिती नाही काय. पोलिस महसूल विभागाकडे बोट दाखवतात, महसूल पोलीस विभागाकडे बोट दाखवितात, वनविभागाला याची जाणीवपूर्वक माहिती नसते. कर्तव्यावर तैनात वाहतूक पोलिसांना तर ट्रॅक्टर, टिप्पर दिसतच नाही.
दरम्यान, या प्रकाराकडे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, वाहतूक नियंत्रक, प्रादेशिक वाहतूक अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस, खनिकर्म अधिकारी या सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
व आपले कर्तव्य पार पाडत नसलेल्या व मुरूम चोरट्याना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यावर व कर्मचाऱ्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निलंबणाची कारवाई करावी अशी जन्मानसात चर्चा आहे.







