Home » शिक्षात्मक » शिक्षण » तर नगर परिषद कार्यालय समोर धरने आंदोलन व आमरण उपोषण ची परवानगी दया

तर नगर परिषद कार्यालय समोर धरने आंदोलन व आमरण उपोषण ची परवानगी दया

Share:


तिरोडा – शहरात सुरु असलेल्या गटर लाईन (मलनि:सारण) प्रकल्पाचे काम मागील ७ – ८ महिन्यापासून सुरू असून कामाचे योग्य पद्धतीने नियोजन न करता पावसाळ्या लगत खोदकाम करतच राहिले, व खोदलेले रोड-रस्ते पुर्ववत करण्यात आले नाही, ज्यामुळे संपुर्ण तिरोडा शहरातील नागरीकांना गैरसुविधा व रहदारीस अडथळा निर्माण होऊन नागरीकांना मुलभुत अधिकारा पासून वंचित करण्यात आले.
सर्वप्रथम गटर पाईप लाईन चे खोदकाम शहरात सुरू झाल्यानंतर अखिल भारतीय ग्राहक पंचायत तिरोडा कडून दि.२७ जानेवारी २०२५ रोजी निवेदन देऊन कामाचे गुणवत्ता व नियोजन बाबद कळविण्यात आले, त्या नंतर दि.३ जुन २०२५ रोजी पुन्हा निवेदन देऊन पावसाळा लागत असल्याने रोड-रस्ते पुर्ववत करून पावसाळ्या पुर्व खोदकाम बंद करण्याबाबत व पावसाळ्या पुर्व योग्य नियोजन करने बाबद कळविण्यात आले. तरीपण प्रशासनाने व संबंधित एजेंसी ने प्रकरणाची गंभीरता लक्षात न घेता नागरीकांच्या जीवाशी खेळण्याची प्रक्रिया सुरू ठेवली.
अखेर अखिल भारतीय ग्राहक पंचायत तिरोडा चे भाकीत खरे ठरले व पहिल्या पावसाळ्यातच खोदकाम केलेले रोड-रस्ते खचले व दररोज फार मोठ्या प्रमाणात रोड-रस्ते खचने सुरूच आहेत, दररोज नागरीक वाहनांसह खड्यात पडत आहेत, कुणाचे हातात तर कुणाचे पायात गंभीर जखमी होत असुन, लहान-मोठे वाहन खड्यात पडत आहेत, नागरीकांना स्वत:ची वाहने रस्त्यावरच फसलेल्या अवस्थेत सोडून जावे लागत आहे.
संपुर्ण प्रकरणाने नागरीकांच्या जीवाशी खेळ होत असून कधीही जीवहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संपूर्ण तिरोडा शहरात धोका निर्माण होऊन नागरीकांना त्यांच्या मुलभूत अधिकारांपासून वंचित करण्यात आलेले आहे.
अश्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायत तिरोडा शाखेकडून प्रकरणाची गंभीरता लक्षात व एजेंसी व प्रशासनाची दुर्लक्षता लक्षात घेता येणा-या दि.१४ जुलै २०२५ पासुन नगर परिषद कार्यालय समोर *धरने आंदोलन* सुरू करणे व धरने आंदोलन सुरू केल्यानंतर एक आठवडयात अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या मांगनी प्रमाने योग्य नियोजन झाले नाही तर दि.२१ जुलै २०२५ पासुन *आमरण उपोषण* करण्याचे कळवून परवानगी मागण्यात आलेली आहे. व हया बाबद पोलिस स्टेशन तिरोडा व तहसिलदार तिरोडा यांना सुध्दा रितसर पत्र देऊन कळविण्यात आलेले आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत तिरोडा च्या निवेदन पत्रात ४ मुद्यांची मांगनी करण्यात आली असून ती खालील प्रमाने आहे.
१) खोदकाम करण्यात आलेल्या रोड-रस्त्यात तात्काळ बोल्डर , गिट्टी टाकून खडीकरण करण्यात यावे.
२) संबंधित कामामुळे ज्या नागरीकांचे नुकसान झाले आहे किंवा ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे अश्यांना यथाशिघ्र भरपाई देण्यात यावे.
३) अखिल भारतीय ग्राहक पंचायत तिरोडा चे निवेदन पत्र दि.२७ जानेवारी २०२५ व दि.३ जुन २०२५ नुसार तात्काळ कार्यवाही हवी.
४) संबंधित कंपनी मे.पिएल अडके नाशिक यांचे कामाचे बिल पुढील नियोजन प्रक्रिये पर्यंत थांबविण्यात यावे.
निवेदन देतांना अखिल भारतीय ग्राहक पंचायत तिरोडा चे तालुका अध्यक्ष- अब्दुल रफीक शेख, उपाध्यक्ष-अशोक रहांगडाले, सचिव-सुशिल भातनकर, संगठनमंत्री-महादेव घरजारे, सहसचिव-वाल्मिक राऊत व ईतर पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरीक गण हजर होते.

Leave a Comment