Home » शिक्षात्मक » शिक्षण » कृषी च्या विद्यार्थ्यांतर्फे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण

कृषी च्या विद्यार्थ्यांतर्फे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण

Share:

 

तिरोडा – राजर्षी शाहू महाराज कॉलेज ऑफ कृषी व्यवसाय सडक अर्जुनी च्या विद्यार्थ्यांनी दि. 5 जुलै रोजी तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना योग, प्राणायाम याविषयी माहिती दिली.
यावेळी कृषी च्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना योग करण्याचे फायदे व महत्व पटवून दिले तसेच योग प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी सुद्धा योगा केले.
यावेळी राजर्षी शाहू महाराज कॉलेज ऑफ कृषी मॅनॅजमेण्ट सडक अर्जुनी चे विद्यार्थी आशिष चौहान, हिमांशू अग्रवाल, अनुसंग वासनिक, रिषभ हातझाडे, आर्यन रोहणकर या विद्यार्थ्यांनी योगा प्रशिक्षण देत निरोगी राहण्याचा संकल्प केला.

Leave a Comment