
जे. सी. पी. च्या साहाय्याने रस्त्यावर पडलेला झाड हटवीते वेळी उपस्थित सरपंच शरनगात, सरपंच जुनेवार, पं. स. सदस्य पटले, पो. पा. बारेवार व नागरिक
तिरोडा -मौजा विहीरगाव येथील प्रशांत संजय वाघमारे वय अंदाजे 23 बर्षे. हा बिर्सी वरून मेंढा येथे दुचाकीने जात असताना रस्त्यामध्ये त्यांच्या अंगावर झाड कोसळल्याने तो जखमी झाला त्याला उपचारासाठी तिरोडा येथिल आधार रुग्णालयात नेण्यात आले त्याची प्रकुर्ती गंभीर असल्याने त्याला गोंदिया येथे हलविण्यात आले आहे. रोडाच्या बाजूला असलेल्या शेतात रोवणी करत असलेल्या महिलांनी ही माहिती बिर्सी चे सरपंच नंदकिशोर शरनगात यांना दिली त्यानंतर लगेच बिर्सी चे सरपंच धावून आले सोबतच, पं.स. सदस्य जे.पी पटले, लाखेगाव चे सरपंच भास्कर जूनेवार, बिर्सी चे पोलीस पाटील युवराज बारेवार, तिरोडा पंचायत समिती चे सभापती तेजराम चव्हाण,गुड्डू रहांगडाले (त मु अध्यक्ष ) गोविंद बिसेन व गावकरी मदतीला धावून आले व त्यांनी प्रशांत ला तिरोडा येथिल आधार रुग्णालयात भरती केले.
काही वेळ वाहतूक कोळंबलेली होती नंतर लाखेगाव चे सरपंच भास्कर जुनेवार यांनी आपली स्वतःची जे. सी. पी. आणून रोडाच्या मधोमत पडलेला झाड रोडाच्या बाजूला केला व मार्ग मोकळा केला.
नंतर काही वेळात तिरोडा तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, तिरोडा पोलीस निरीक्षक, फ़ॉरेस्ट ऑफिसर व संबंधित अधिकारी घटनास्थळी आले व त्यांनी संपूर्ण रोडाची पाहणी करून रस्त्याचा जवळ असलेल्या जीर्ण झाडांची पाहणी केली.








