Home » शिक्षात्मक » शिक्षण » सुकडी आरोग्य केंद्रात नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण

सुकडी आरोग्य केंद्रात नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण

Share:

नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण करताना जगदीशजी बावनथडे

तिरोडा-आज दि. 14 जुलै 2025 ला प्राथमिक आरोग्य केंद्र सुकडी येथे नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्हा परिषद सदस्य तथा तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट ) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शना नंदागवळी, प. स. सदस्य विजय बिंझाडे, कविताताई सोनेवाने, आर. एस. पारधी पंचायत समिती बांधकाम विभाग तिरोडा, सौ.कनकलता काळे मॅडम आय सी डी एस तिरोडा, मा.श्री.सुनील भाऊ मेश्राम सरपंच सुकळी, मा.श्री.संदीप भाऊ कुर्वे उपसरपंच सुकडी, माननीय सौ.पुष्पलता ताई गौतम सरपंच आलेझरी, मा.सुरेश भाऊ रायकर, मा.प्रशांत जी ओके, मा.हर्षवर्धन जी मेश्राम, मा.पारस जी बावनथळे, डॉक्टर शिवकुमार हरिणखेडे, श्री.पी.एल राऊत, सौ.छाया ताई घाबरडे, कु.अर्चनाताई उके, कु.पल्लवी रामटेके, कु.मीनाक्षी बघेले, श्री.राधेश्याम पिंपळकर, मा.दुर्गेश्वरी कळम, मा.योगेश गुनेरिया, मा.सुनील भाले, मा.तेजस गुरव, मा.संजय लिल्हारे, मा.कु.डॉ.लक्ष्मी पटले व क्षेत्रातील-गावातील नागरिक मोठ्या संख्येने रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी उपस्थित होते.

रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी क्षेत्रातील जनतेने बावनथडेजी यांचे आभार मानले,
खरं तर गेल्या अनेक वर्षापासून बावनथडेजी राजकारणाच्या माध्यमातून जनसेवा करत आहेत,
क्षेत्रातील जनतेला आरोग्य, शिक्षण, रोजगार अशा अनेक गोष्टींवर भर देऊन जवाबदारी पुर्वक कामे करत स्वताःला जनतेला अर्पण केले,
रुग्णवाहिकेच्या लोकार्पणामुळे क्षेत्रातील जनतेत एक आनंददायी वातावरण निर्माण झाला आहे.

Leave a Comment