Home » शिक्षात्मक » शिक्षण » मुंडीकोटा आरोग्य केंद्रात नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण

मुंडीकोटा आरोग्य केंद्रात नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण

Share:

नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण करताना किरनभाऊ पारधी व रजनीताई कुंभरे

 

तिरोडा – आज दिनांक 14 जुलै 2025 ला प्राथमिक आरोग्य केंद्र मुडीकोटा. येथे एक नवीन रुग्णवाहिका चे लोकार्पण करण्यात आले .रुग्णांच्या सेवा करता मागील काही वर्षापासून सातत्याने मागणी करण्यात येत होती की रुग्णवाहिका आपल्याला पाहिजे ती आज जिल्हा परिषद च्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे. सन्माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष मा.लायकारामजि भेंडारकर,उपाध्यक्ष मा. सुरेशजि हर्षे, महिला समाजकल्याण सभापती रजनीताई कुमरे , जिल्हा परिषद सदस्य मा. किरणभाऊ पारधी यांच्या प्रयत्नातून मुडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्राला एक रुग्णवाहिका मिळाली. या प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत 29 गावांचा समावेश आहे रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा याकरीता रुग्णवाहीका अत्यंत आवश्यकता होती. ही रुग्णवहीका मिळाल्याने रुग्णांना जो त्रास सहन करावा लागत होता तो त्रास आता दूर झाला. आरोग्य सेवा ही सर्वात महत्त्वाची सेवा असल्यामुळे अजून या आरोग्य केंद्राला नवनवीन साधने उपलब्ध करून देण्याच्या आमचा प्रयत्न राहील असे यावेळी जि. प. सदस्य किरणभाऊ पारधी व सभापती रजनीताई कुंभरे यांनी सांगितले.

यावेळी पंचायत समिती तिरोडा सौ.कुंताताई पटले, प. स.सदस्य वनिताताई भांडारकर, मा.जि .प सदस्य मनोज भाऊ डोंगरे प.स सदस्य प्रमिलाताई भलावी ,सरपंच प्रतिमा जैतवार , मांडवी चे सरपंच तुरेंद्रजि नागपुरे, आरोग्य आरोग्य विभागाचे सर्व पदाधिकारी डॉक्टर, व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment