तिरोडा – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 18 जुलै रोजी अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक संस्था एकोडी गोंदिया यांच्या पुढाकाराने तिरोडा तालुक्यातील ग्राम पंचायत सुकडी (डाकराम) कार्यालय येथे पुण्यतिथी साजरी करण्यात आली. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची पुजा अर्चना व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुआत करण्यात आली. महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मोलाचे योगदान आहे. येथील कष्टकरी, मजूर वर्गासाठी त्यांनी आपले प्रखर विचार मांडले आहेत. पत्रकारांच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार घराघरात पोहचवा असे आवाहन पुण्यतिथी कार्यक‘माचे अध्यक्ष युवा नेता जगदीश (बालु) बावनथड़े जिल्हा परिषद सदस्य यांनी केले.
या कार्यक्रमास सुकडीचे सरपंच सुनिल मेश्राम, उपसरपंच संदिप कुर्वे, निशाताई वासनिक, मुन्ना बिंझाडे दलित सामाजिक सेल जिल्हा उपाध्यक्ष, देवेंद्र चौधरी माजी युवा अध्यक्ष NCP तिरोडा, लोकेश राऊत रोजगार सेवक, राजेंद्र मेश्राम, उमेश मेश्राम, सुरेश रायकर ग्राम पंचायत सदस्य, ठाकरे मुख्याध्यापक, महेंद्र मेश्राम, सोनु भोयर, चंद्रशेखर बावनथड़े, विपिन गजभिये, रमेश कापसे, सुनिताताई कोटेकर, प्रगति बिसेन, सदानंद बोपचे, राजेशकुमार तायवाडे अध्यक्ष अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था, उपाध्यक्ष आरिफ़ पठान अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था, सचिव टेकसिंह पुसाम, के.एस. असाठी, पोर्णिमा तायवाडे, मुन्नीबाई ठाकरे, हर्षवर्धन मेश्राम, उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जगदीश (बालु) बावनथड़े व संदिप कुर्वे यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे संचलन सुरेश रायकर व आभार आरिफ़ पठान यांनी मानले.







