Home » शिक्षात्मक » शिक्षण » घरकुल समस्याविषयी पंचायत समिती सभापती यांच्या चेम्बर मद्धे बैठक

घरकुल समस्याविषयी पंचायत समिती सभापती यांच्या चेम्बर मद्धे बैठक

Share:

 

मुंडीपार येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेताना जी.प. सदस्य किरणभाऊ पारधी व प.स. सदस्य पिंटू भाऊ चौधरी

तिरोडा – देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र भाई मोदी यांचा संकल्पनेतून प्रत्येक लोकांना अन्न व निवारा मिळावा या संकल्पनेतून आज मुंडीपार गावातील काही लोकांना ज्यांचे घरकुलामध्ये नाव आहेत अशा सर्व लोकांना दुसरी किस्त त्यांच्या खात्यावर जमा होत नव्हती यामुळे त्यांनी जी.प. सदस्य किरणभाऊ पारधी व प. स. सदस्य पिंटूभाऊचौधरी यांना सांगितले ह्या विषयाची दखल घेत आज 24 जुलै ला दुपारी 2. वाजता दरम्यान तिरोडा पंचायत समिती चे सभापती यांच्या चेंबर मध्ये मुंडीपार येथिल नागरिक आले यावेळी जी. प. सदस्य किरणभाऊ पारधी व प. स. सदस्य पिंटूभाऊ चौधरी उपस्थित होते नागरिकांनी आपल्या समस्या सांगितल्या तुमच्या समस्याचा निराकरण करणे हे आमचे काम आहे असे जी. प. सदस्य ब प. स. सदस्य यांनी सांगितले व त्वरित घरकुल चे कनिष्ठ अभियंता नंदकिशोर बघेले यांना बोलावून थांबलेले घरकुल लाभार्त्यांचे बील देयके त्वरित मारण्यास सांगितले त्यावर बघेले यांनी आज सायंकाळ पर्यंत घरकुल लाभार्त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असे आश्वासन दिले.
यामुळे मुंडीपार येथिल घरकुल लाभार्थ्यांनी जी.प.सदस्य किरणभाऊ पारधी व प.स.सदस्य पिंटूभाऊ चौधरी यांचे आभार मानले.

आमचे नेते सन्मा.प्रफुल्लभाई पटेल व राजेंद्र जैन साहेब यांच्या नेतृवात आपण नेहमी आपल्या क्षेत्राच्या नागरिकांचा व क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीकोनातून आम्ही कामे करीत राहू. असे यावेळी जी.प. सदस्य किरणभाऊ पारधी यांनी सांगितले

Leave a Comment